Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्याच्या ‘वॉरियर आजीं’साठी सोनू सूदने मार्शल आर्ट्स क्लास सुरु करुन दिला

Sonu Sood opens martial art training school for 85 year old Pune warriors elder lady
, सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (12:30 IST)
अलीकडेच सोशल मीडियावर पुण्याच्या एका वॉरियर आजींचा लाठ्या-काठ्या फिरवतानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काठ्यांचा खेळ सादर करणाऱ्या या आजींचा व्हिडिओ बघून सोनू सूदने त्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सोनूने आपला शब्द पाळला आणि गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आजीबाईंच्या मदतीसाठी मार्शल आर्ट्स क्लास सुरु करुन दिले आहेत.
 
सोनूच्या या पावलामुळे त्याचे कौतुक होत आहे. ८५ वर्षीय शांताबाई पवार यांनी सोनू सूदचे आभार मानले आहे. सोनू सूदचे आभार मानण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे नाव सोनू सूद मार्शल आर्ट्स स्कूल असं ठेवण्यात आलं आहे. आपण या प्रशिक्षण वर्गाला लवकरच भेट देऊ असा शब्दही सोनूने दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WhatsApp चे नवीन अपडेट ग्रुप कॉल्ससाठी वेगवेगळ्या रिंगटोन आणि बरेच काही