Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

SSC HSC Exam 2024 Dates दहावी-बारावी परीक्षेची तारीख

students
, सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (15:50 IST)
SSC HSC Exam 2024 Dates बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची १ मार्चपासून होणार सुरू
 
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्याप्रमाणे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे.
 
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत दहावी-बारावीची लेखी परीक्षा घेण्यात येत असून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेचा कालावधी राज्य मंडळाने जाहीर केला आहे. 
 
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 दरम्यान तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च 2024 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.
 
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. 
 
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करणे या हेतूने लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.
 
मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असल्याचे सांगितले आहे. इतर संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्‌ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लिव्ह इन पार्टनरची कुकरने हत्या