Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

1 जूनपासून एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस 'शिवाई' धावणार पुण्यात होणार लोकार्पण सोहळा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उप‍स्थित राहणार

Webdunia
मंगळवार, 31 मे 2022 (08:43 IST)
वातावरणातील प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने वाहन क्षेत्रातील सर्वाधिक मोठा सार्वजनिक उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन हामंडळाच्या ताफ्यात लवकरच पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक बस  दाखल होणार आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी बिरूदावली मिरवणारी 'लालपरी' अर्थात एसटी १ जून २०२२ रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे.
 
या दिनाचे औचित्य साधत एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या 'शिवाई' (Shivai) या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  व उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुणे येथे बुधवारी (१ जून रोजी) होणाऱ्या लोकार्पण सोहोळ्यानंतर ही पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी आज दिली.
 
१ जून रोजी एसटीचा वर्धापनदिन
१ जून, १९४८ रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती. या घटनेच्या सन्मानार्थ एसटी महामंडळाच्यावतीने दरवर्षी १ जून रोजी एसटीचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपली एसटी सुद्धा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे, हा एक दुग्धशर्करेचा योग आहे, अशा शब्दात ॲड. परब यांनी आनंद व्यक्त केला. १ जून १९४८ रोजी एसटीची पहिली बस पुणे-अहमदनगर-पुणे अशी धावली होती. त्यापार्श्वभूमिवर बुधवारी, पुणे येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'शिवाई'चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर ही बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावेल. याशिवाय विद्युत प्रभारक केंद्राचेही उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, अहमदनगर येथूनही शिवाई बस सुटणार आहे. ही बस पुण्यापर्यंत धावेल. १ जून १९४८ रोजी अहमदनगर येथून धावलेल्या पहिल्या बसचे वाहक श्री. लक्ष्मणराव केवटे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे, असेही मंत्री, ॲड. परब यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments