स्वप्निल लोणकर या एमपीएससी परिक्षेच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर आता त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.पुण्यात विद्यार्थ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडलं आहे. स्वप्निलच्या आत्महत्येला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे, असं म्हणत या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागावा आणि स्वप्निल लोणकरला न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेली विद्यार्थिनी आणि शिवसेनेची कार्यकर्ती शर्मिला येवले हिने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरुन खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. कार्यालयात लावलेल्या जाळीमुळे ती जाळीतच अडकली. आपल्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे केल्याचं तिने माध्यम प्रतिनिधींना सांगितलं.