मागच्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. हवामान बदलामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याच्या तपमानात वाढ झाली आहे.
पुण्यात 2014 ते 2024 या दहा वर्षांमध्ये फक्त सात वेळा किमान तपमानानाने 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उसळी मारली आहे. यात या दशकातील फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक किमान तपमान 20 फेब्रुवारी 2016 रोजी 20.25 अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे या दशकातील फेब्रुवारीमधील उच्चांकी किमान तपमान आहे. त्याआधी 21 फेब्रुवारी 2016 मध्ये 19.5 आणि 22 फेब्रुवारी 2019 मध्ये 19.2 अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. त्यानंतर गेली चार वर्षे किमान तपमानाचा पारा 17.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवला गेला नव्हता. 2020 मध्ये 17.2, 2021 मध्ये 16.7, 2022 मध्ये 15.9 आणि 2023 मध्ये 14.8 अंश सेल्सिअस इतके फेब्रुवारीमधील उच्चांकी किमान तपमान होते. त्यानंतर या वर्षी सलग दोन दिवस किमान तपमानाचा पारा 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवला गेला. त्यामुळे पुण्यात रात्रीचा उकाडा वाढत आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.
Edited by: Ratnadeep Ranshoor