Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लॉजमध्ये तरुण तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला

The body of a young woman was found naked in the lodge
, शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (22:08 IST)
पुण्यातील लॉजमध्ये एका तरुण आणि तरुणीचा  मृतदेह नग्नावस्थेत सापडला. मृत तरुणाने आधी तरुणीचा गळा दाबून खून करत संपवलं. त्यानंतर त्याने पंख्याला साडीने गळफास घेत जगाचा निरोप घेतला. ही घटना 25 नोव्हेंबर गुरुवार सकाळी 10 वाजता समोर आली. 
 
35 वर्षीय मृत तरुण हा अविवाहित होता. तर महिला ही विवाहित होती. या विवाहितेचं या तरुणासह गेल्या 2 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. या विवाहतेचा पती हा खून प्रकरणात 4 वर्षांपासून कारावास भोगत आहे. विवाहित महिला ही या तरुणाच्या प्रेमात होती. दोघांमध्येही 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही नेहमीच दिघीतील एका ठरलेल्या लॉजमध्ये भेटायचे. अशाच प्रकार ठरल्यानुसार 24 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता भेटले. दोघेही लॉजमधील रुममध्ये आले. या दरम्यान दोघांमध्ये कोणत्या तरी मुद्द्यावरुन कडाक्याचा भांडण झालं.  या वादावादीतून या तरुणाने विवाहित प्रेयसीचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने गळफास आत्महत्या केली. 
 
हे दोघेही गुरुवारी 25 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता लॉजमधून चेक आऊट करणार होते.  ठरलेली वेळ उलटली. यानंतरही दोघेही आले नाही. त्यामुळे लॉज मॅनेजर यांनी त्यांना दिलेल्या रुमवर पोहचले. बाहेरुन दार ठोठावलं.आतून कोणीच साद दिली नाही. त्यामुळे अखेरीस लॉज मॅनेजर यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हायरल झालेला हा फोटो मॉर्फ, राष्ट्रवादीने दिले प्रत्युत्तर