Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘कोव्हॅक्सिन’, ‘कोविशिल्ड’ची लस मंगळवारी शहरातील ‘या’ केंद्रावर मिळणार

Webdunia
मंगळवार, 1 जून 2021 (08:07 IST)
पिंपरी-चिंचवड शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना मंगळवारी कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा तर ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. ‘कोव्हॅक्सिन’चा डोस 3 केंद्रावर दिला जाणार असून एका केंद्रांवर 100 जणांना लस दिली जाणार आहे. तर, कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस 33 केंद्रांवर दिला जाणार आहे. एका केंद्रांवर 100 जणांना लस दिली जाणार आहे.
 
कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 28 दिवस झालेल्यांना देण्यात येणार आहे. तर, शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही.
 
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.
 
‘या’ तीन केंद्रांवर मिळणार ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस !
 
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (तालेरा रुग्णालय), सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी या केंद्रावर ‘कोव्हॅक्सिन’ या लसीचा दुसरा डोस आज  सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे.
 
‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस या 33 केंद्रांवर मिळणार लस !
 
ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, नवीन आकुर्डी रुग्णालय, साई आंब्रेला संभाजीनगर, रोटरी क्लब सेंटर, घरकुल दवाखाना चिखली, यमुनानगर रुग्णालय, रूपीनगर शाळा, तळवडे समाज मंदिर शाळा, प्राथमिक शाळा म्हेत्रेवस्ती, महापालिका शाळा खराळवाडी, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, नेहरूनगर उर्दू शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालय दिघी (सीएसएम), पंडीत जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, कासारवाडी दवाखाना,पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी,खिंवसरा हॉस्पिटल थेरगाव, कांतीलाल खिवसरा पाटील प्राथमिक शाळा थेरगाव, महापालिका शाळा पिंपळेनिलख, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, भाटनगर दवाखाना पिंपरी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, महापालिका शाळा किवळे, बिजलीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे,प्रेमलोक पार्क दवाखाना, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस आज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

पुढील लेख
Show comments