suvichar

खुशखबर, पुण्यात गिर्यारोहणाला परवानगी

Webdunia
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (08:45 IST)
पुण्यात गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या गिर्यारोहणाला ही परवानगी मिळाली असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश काढले आहेत.याबाबत महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ संस्थेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदन सादर केले होते. 
 
या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी गड किल्ल्यांवरील ट्रेकिंगला परवानगी दिली आहे. परंतु, ही परवानगी देताना काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यामध्ये कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरुपात पुणे जिल्हयातील गड किल्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण, ट्रेकिंग साठी जाताना एका ग्रुपमध्ये १५ पेक्षा जास्त सदस्य नसावेत तसेच ट्रेकिंगसाठी येणा-या प्रत्येक नागरिकाचे  थर्मल स्क्रिनिंग करणेत यावे, अधिक संख्या असल्यास वेगवेगळे ग्रुप करुन वेळेमध्ये फरक ठेवावा, ट्रेकिंगसाठी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील, सहभागी व्यक्तींनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहिर केलेल्या सूचनांनुसार योग्य ते शारिरिक अंतर राखणेबाबतचा नियम काटेकोरपणे पाळणेत यावा, दहा वर्षांचे आतील तसेच पासष्ट वर्षावरील व्यक्तींना सहभाग देऊ नये, ताप, सर्दी खोकला इ. कोरोना सदृश्य लक्षणे असणा-या व्यक्तींना सहभाग देऊ नये, स्थानिकांच्या घरात भोजन, मुक्काम इ.करु नये, एकमेकांच्या वस्तू हाताळू नयेत आदि सूचना देण्यात आल्या असून या सूचनांचे उल्‍लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

चंद्रशेखर बावनकुळे यांचे अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर

LIVE: प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना अल्टिमेटम दिला

महाराष्ट्रात राजकीय भूकंप: अजित पवार गटाचे १५-२० आमदार शरद पवारांच्या संपर्कात

४ विधान परिषद जागांसाठी भाजपमध्ये प्रचारमोहीम सुरू

महाराष्ट्रातील एसआयआरमधून २९ दशलक्ष मतदारांची नावे वगळण्यात येतील, प्रकाश आंबेडकरांचा दावा

पुढील लेख
Show comments