Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील : राठोड

Uddhav Thackeray to take final decision on ministerial post: Rathore maharashtra  news pune news in marathi webdunia marathi
, सोमवार, 19 जुलै 2021 (15:45 IST)
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लिीनचिट दिल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात नाव आल्याने राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान,आता संजय राठोड यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा सुरु झाली आहे.मंत्रिपदासाठी संजय राठोड आशावादी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.जळगाव दौऱ्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असं राठोड म्हणाले.
 
पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीनचिट दिल्याची चर्चा आहे. यामुळे राठोड यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन होईल अशा चर्चा जोर धरु लागल्या आहेत. त्यात आता त्यांनी मंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे. माझ्या मंत्रिपदाबाबत विरोधकांनी कितीही विरोध केला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे.संजय राठोड हे रस्त्यावर उतरत विविध भागांचा दौरा करत आहेत. वाड्या-वस्त्या-तांड्यावर जाऊन समाज बांधवांशी चर्चा करीत आहेत.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तुम्हाला क्लीन चीट दिली असल्याचे बोललं जात आहे,या प्रश्नावर बोलताना राठोड यांनी सांगितलं की “या बाबत आपण एकदा बोललो आहोत,या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे, योग्य वेळ येईल तेव्हा आपण बोलणार आहोत,” असं ते म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेऊ नये, आपली लायकी काय?