Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे महानगर नियोजन समितीसाठी मतदान; पिंपरीतील ‘हे’ 10 नगरसेवक निवडणूक रिंगणात

Voting for Pune Metropolitan Planning Committee; Pimpri's 'Hey' 10 councilors in the election arena पुणे महानगर नियोजन समितीसाठी मतदान; पिंपरीतील ‘हे’ 10 नगरसेवक निवडणूक रिंगणात Maharashtra News Pune Marathi News In Webdunia Marathi
, बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (08:12 IST)
पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी उद्या (बुधवारी) मतदान होणार आहे. 3 मतदारसंघात 30 जागांसाठी 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 14 मतदान केंद्रांवर हे मतदान होणार असून पिंपरी महापालिका मुख्यालयात मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे 7 आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 असे 10 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि.12) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
 
पीएमआरडीए हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील विविध विकासकामांच्या दृष्टीने पुणे महानगर नियोजन समितीची महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीसाठी मोठे नागरी मतदार संघ (पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका), लहान नागरी मतदार संघ (नगर परिषदा) आणि ग्रामीण मतदार संघ (जिल्हा परिषद) असे 3 मतदारसंघ आहेत. यातील 978 मतदार मतदान करणार आहेत.
 
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका या मोठ्या नागरी मतदारसंघात 22 जागा आहेत. त्यासाठीच्या निवडणूक रिंगणात पिंपरी महापालिकेतील 10 नगरसेवक आहेत. सत्ताधारी भाजपकडून सभागृह नेते नामदेव ढाके, नगरसेवक चंद्रकांत नखाते, अभिषेक बारणे, वसंत बोराटे, संदीप कस्पटे, जयश्री गावडे, निर्मला गायकवाड आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे, डॉ. वैशाली घोडेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 3 मतदारसंघात 30 जागांसाठी 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 978 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक ! रेल्वेत महिलांच्या डब्यात नराधमाचे चक्क ‘अश्लिल’ चाळे, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं प्रचंड खळबळ