Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाप्परे, पार्टीत चक्क महिलेसमोर तीन जणांनी अंगावरील कपडे काढून ...

woman
, सोमवार, 7 डिसेंबर 2020 (11:01 IST)
वाढदिवसाच्या पार्टीत  चक्क महिलेसमोर तीन जणांनी अंगावरील कपडे काढून विवस्त्र अवस्थेत डान्स केला तसेच महिलेसोबत अश्लिल वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील सांळुके विहारमधील ग्राफीकॉन सोसायटीमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
 
राज उर्फ कैलास महेश गणात्रा (वय-47) याला अटक केली आहे. आरोपीचे साधीदार अमोर कंडई आणि सिद्धार्थ शेट्टी हे दोघे फरार आहेत. या प्रकरणी पीडित महिलेने कोंढवा पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे.
 
या घटनेमध्ये, पीडित महिला 37 वर्षाची असून तिन्ही आरोपी तिच्या परिचयातील आहेत. आरोपी राज उर्फ कैलास महेश गणात्रा याचा 25 ऑक्टोबरला वाढदिवस होता. राज याने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला पीडित महिलेला निमंत्रित केले होते. पार्टी रंगात आली असताना राज, अमोल आणि सिद्धार्थ या तिघांनी एका गाण्यावर चक्क महिलेसमोर अंगावरील कपडे उतवले आणि विवस्त्र अवस्थेत डान्स सुरु केला.
 
एवढेच नाही, तर पीडित महिलेसोबत अश्लिल वर्तनही केले. त्यानंतर आरोपीनी पीडित महिलेला शिवीगाळ करून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्नही केला. या प्रकाराचा पीडितेला मोठा धक्का बसला आहे. महिला जवळपास महिनाभर घराबाहेर पडली नाही. तिला आरोपींची भीती वाटत होती. अखेर पीडिता या धक्क्यातून बाहेर निघाल्यानंतर तिने कोंढवा पोलिसात धाव घेत पोलिसांना आपबिती सांगितली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात स्पुटनिक-५ लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु