Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तु माझ्यासोबत अफेअर करून रिलेशनमध्ये रहा’, कोंढव्यात गुन्हा दाखल

You have an affair with me and stay in a relationship '
, सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (16:03 IST)
पुण्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून सामुहिक अत्याचाराच्या घटना घडत असताना पुण्यात  महिलांच्या विनयभंगाच्या घटना देखील वाढत आहेत. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोहम्मदवाडी परिसरात एका व्यक्तीने 40 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपुर्व संजय भांबुरे असे गुन्हा  दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 40 वर्षीय महिला आणि आरोपी हे एकाच परिसरात राहणारे आहेत. आरोपीने महिले सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.फिर्यादी महिला त्यांच्या सोसायटीच्या परिसरात फिरत असताना आरोपीने जवळ येऊन ‘तुझी फिगर खुप चांगलीय, तुझं लग्न झाल्यास मला काही त्रास नाही.तु माझ्यासोबत अफेअर करून रिलेशनमध्ये रहा’ असे बोलून महिलेचा विनयभंग केला.हा प्रकार जानेवारी 2021 मध्ये घडला आहे.पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता.कोंढवा पोलिसांनी महिलेच्या तक्रार अर्जाची दखल घेऊन चौकशी करुन आरोपी अपुर्व भांबुरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बर्गे करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

The Knee Clinic ने मुंबईत सुरू केले पहिले रोबोटिक नी रिप्लेसमेंट केंद्र