साहित्य : 1 किलो गाजरे, एक वाटी मोहरीची डाळ, दोन चमचे हळद, चवीप्रमाणे मीठ.
कृती : गाजरे स्वच्छ धुऊन ती, तासून घ्यावीत व त्यांच्या साधारण तीन इंच लांब व अर्ध्या इंच रुंदीच्या फोडी कराव्यात. एक मध्यम आकाराचा माठ घेऊन, तो स्वच्छ धुऊन, कोरडा करून घ्यावा. मोहरीची डाळ, हळद व मीठ हे सर्व मिसळून घेऊन गाजराच्या फोडीना लावावे व त्या फोडी माठात टाकून वर कढत पाणी घालावे. माठाचे तोंड फडक्याने बांधून माठ एका घडवंचीवर ठेवावा. रोज एकदा रवीने हालवावे. तीन दिवसांनंतर पेय तयार होते. हे पेय जेवणाच्या वेळी व विशेषत: थंडीच्या दिवसांत ते पिण्यास देण्याची पंजाबमध्ये पद्धत आहे. हे पेय 3-4 दिवस टिकते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा