Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रक्षा बंधन 2021 : शुभ मुहूर्तावर बांधा राखी, या काळात राखी बांधणे टाळा

Raksha Bandhan 2021 date shubh muhurat
, शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (17:12 IST)
हिंदू दिनदर्शिकेनुसार रक्षा बंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावेळी हा उत्सव इंग्रजी दिनदर्शिकेनुसार रविवार 22 ऑगस्ट 2021 रोजी असेल. चला जाणून घेऊया शुभ वेळ आणि योग. याव्यतिरिक्त कधी राखी बांधू नये हे देखील जाणून घ्या-
 
शुभ मुहूर्त :
1. अभिजीत मुहूर्त - सकाळी 11:57:51 ते दुपारी 12:49:52 पर्यंत
2. अमृत काळ: - सकाळी 09:34 ते 11:07 पर्यंत
3. ब्रह्म मुहूर्त - सकाळी 04:33 ते 05:21 पर्यंत
 
शुभ संयोग :
1. शोभन योग : सकाळी 06 वाजून 15 मिनिटापासून ते सकाळी 10 वाजून 34 मिनिटापर्यंत शोभन योग राहील. हा योग चांगला आहे. 
या दरम्यान सर्व प्रकाराचे मांगलिक कार्य केले जाऊ शकतात. 
शोभन योग काळ - 21 ऑगस्ट 12:54 pm – 22 ऑगस्ट 10:33 am

2. धनिष्ठा नक्षत्र : धनिष्ठा नक्षत्र संध्याकाळी सुमारे 07 वाजून 39 मिनिटापर्यंत राहील. धनिष्ठाचा स्वामी ग्रह मंगळ आहे. या नक्षत्रात शुभ मुहूर्तावर राखी बांधता येईल. 
धनिष्ठा काळ- 21 ऑगस्ट 08:21 pm – 22 ऑगस्ट 07:39 pm पर्यंत.
 
या दरम्यान राखी बांधणे टाळा -
राहु काळ : 17:16:31 ते 18:54:05 पर्यंत
दुष्टमुहूर्त : 17:10:01 ते 18:02:03 पर्यंत
भद्रा काळ : भद्रा काळ 23 ऑगस्ट, 2021 सकाळी 05:34 ते 06:12 पर्यंत राहील.
राखी भद्राकाळ आणि राहुकाळ या दरम्यान बांधली जात नाही कारण या काळात शुभ कार्य वर्जित मानले गेले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जर जीवन अस्थिरतेने घेरले असेल तर या दिवशी हे सोपे उपाय करा