Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Raksha Bandhan 2026 Date : रक्षाबंधन कधी ? भावाला राखी बांधण्याची योग्य वेळ, शुभ मुहूर्त आणि पूजेची संपूर्ण माहिती

रक्षाबंधन २०२६
वर्ष २०२६ मध्ये भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजेच रक्षाबंधन शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण अत्यंत उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रात याच दिवशी नारळी पौर्णिमा देखील साजरी केली जाते.
 
रक्षाबंधन हा बहीण-भावांच्या प्रेमाचा उत्सव आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर पवित्र धागा अर्थातच रक्षासूत्र बांधतात; भाऊ बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात आणि बहिणी भावांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हा सण जबाबदारी आणि विश्वासाचे प्रतीक आहे. चला जाणून घेऊया की या वर्षी रक्षाबंधन कधी आहे आणि त्याची तारीख व महत्त्व काय आहे-
 
रक्षाबंधन २०२६: तिथी आणि शुभ मुहूर्त
पंचांगाच्या गणनेनुसार, या वर्षी रक्षाबंधन २८ ऑगस्ट रोजी साजरे केले जाईल. पौर्णिमा तिथी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०८ वाजता सुरू होईल आणि २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९:४७ वाजेपर्यंत असेल. 'उदय तिथी' विचारात घेता, हा सण २८ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.
 
राखी बांधण्याची योग्य वेळ (शुभ मुहूर्त)
जरी पौर्णिमा तिथी सकाळी ९:४७ ला संपत असली, तरी उदयतिथीनुसार २८ ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस रक्षाबंधनासाठी शुभ मानला जाईल. पंचांगानुसार मुख्य मुहूर्त खालीलप्रमाणे आहेत:
मुख्य शुभ मुहूर्त: सकाळी ०५:५७ ते सकाळी ०९:४८ पर्यंत (कालावधी: ३ तास ५१ मिनिटे)
लाभ-उन्नती मुहूर्त: सकाळी ०७:३३ ते सकाळी ०९:१० पर्यंत
अमृत-सर्वोत्तम मुहूर्त: सकाळी ०९:१० ते सकाळी १०:४६ पर्यंत
दुपारचा मुहूर्त (अथवा अपराहन काळ): दुपारी ०१:३० ते दुपारी ०४:०० पर्यंत (सकाळी जमले नाही तर या वेळेतही राखी बांधता येईल).
 
रक्षाबंधनाची योग्य पूजा विधी 
राखी बांधताना शास्त्रोक्त पद्धतीचा वापर केल्यास भावा-बहिणीच्या नात्यात अधिक गोडवा आणि समृद्धी येते. पूजेची थाळी आणि विधी खालीलप्रमाणे असावा:
 
पूजेच्या थाळीत काय असावे?
चांदीचे ताट (थाळी)
कुंकू/रोली आणि अक्षता
तुपाचा दिवा
सुंदर राखी 
नारळ
भावाचे तोंड गोड करण्यासाठी मिठाई
 
राखी बांधण्याची योग्य पद्धत
दिशा कोणती असावी?: राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे आणि बहिणीचे तोंड पश्चिम दिशेला असावे. (कधीही दक्षिण दिशेला तोंड करून राखी बांधू नये).
 
तिलक आणि अक्षता: सर्वप्रथम भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा (तिलक) लावावा आणि त्यावर अक्षता लावाव्यात.
 
नारळ: भावाला कुंकु लावून नारळ द्यावं.

आरती ओवाळणे: त्यानंतर दिव्याने भावाची प्रेमाने आरती ओवाळावी, जेणेकरून त्याला कोणाची नजर लागणार नाही.
 
राखी बांधणे: भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर रेशमी राखी बांधावी. राखी बांधताना भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी मनात प्रार्थना करावी.
 
तोंड गोड करणे: राखी बांधून झाल्यावर भावाला मिठाई भरवून त्याचे तोंड गोड करावे.
 
आशीर्वाद आणि भेटवस्तू: लहान भावाने बहिणीच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावेत, तर मोठ्या भावाने बहिणीला प्रेमाने आशीर्वाद द्यावेत आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देत सुंदर भेटवस्तू द्यावी.
 
रक्षाबंधनाचा हा सण केवळ धागा बांधण्याचा नसून एकमेकांवरील विश्वास आणि रक्षणाचा सण आहे. यंदा सकाळच्या शुभ मुहूर्तावर राखी बांधणे अधिक फलदायी ठरेल!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर