Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रक्षा बंधन विशेष : जाणून घेऊ या पौराणिक काळातील 10 भावांच्या प्रख्यात बहिणी

sanatan dharma
, गुरूवार, 30 जुलै 2020 (20:57 IST)
भाऊ बहिणींच्या प्रेमळ नात्याचा हा सण असून रक्षा बंधनाला बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. इतिहासात भाऊ आणि बहिणींच्या बऱ्याच कथा आहेत. चला जाणून घेऊ या इतिहासातील 10 प्रख्यात बहिणींची नावे.
 
1 महादेवाची बहीण : असे म्हणतात की महादेवाची बहीण आसावरी देवी होती. असे म्हणतात की देवी पार्वती एकट्याच राहायचा तर त्यांनी एकदा महादेवांना म्हटले की मला एक नणंद असती तर किती बरं झाले असते. तेव्हा शिवाने आपल्या मायेने आपल्या एका बहिणीची निर्मिती केली आणि पार्वतीस म्हणाले की ही आपली नणंद आहे. उल्लेखनीय आहे की देवी पार्वतीची सावत्र बहीण देवी लक्ष्मी असे ज्यांचं लग्न श्रीहरी विष्णूंसह झाले होते.. अश्याच प्रकारे भगवान शिवाची मुलगी म्हणजे कार्तिकेय आणि गणेशाची बहीण ज्योती, अशोक सुंदरी आणि मनसा देवी प्रख्यात आहे.
 
2 भगवान विष्णूंची बहीण : शाक्त परंपरेत तीन गुपितांचे वर्णन केले आहे. प्राधानिक, वैकृतिक आणि मुक्ती. या प्रश्नाचा, या गुपिताचे वर्णन प्राधानिक रहस्यांमध्ये दिले आहे. यामध्ये सांगितले आहे की महालक्ष्मीने विष्णू आणि सरस्वतीची निर्मिती केली आहे म्हणजे विष्णू आणि सरस्वती हे दोघे भाऊ आणि बहीण आहे. सरस्वतीचे लग्न ब्रह्माजींशी आणि ब्रह्माजींच्या दुसऱ्या सरस्वतीचे लग्न विष्णूंशी झाले होते.
 
या व्यतिरिक्त दक्षिण भारतातील एका आख्यायिकेनुसार मीनाक्षीदेवी नावाची एक देवी भगवान शिवाच्या पत्नीचे अवतार आणि भगवान विष्णूंची बहीण होत्या. मीनाक्षी देवी यांचे मीनाक्षी अम्मन देऊळ दक्षिण भारतात आहे.
 
3 बालीची बहीण : जेव्हा भगवान वामन ने राजा बाली(बळी)कडून तीन पावले जमीन मागून त्यांना पाताळाचा राजा बनविले होते. तेव्हा राजा बळीने देखील वर म्हणून देवांना दिवसरात्र आपल्या समोर राहण्याचे वचन घेतले. भगवानाला वामनावतारानंतर पुन्हा लक्ष्मीकडे जायचे होते पण ते हे वाचन देऊन बांधले गेले होते आणि ते इथेच रसातळात बळीच्या  सेवेत राहू लागले. इथे या गोष्टी मुळे देवी लक्ष्मीला काळजी वाटू लागली. अश्या परिस्थितीत नारदजींनी लक्ष्मीला एक उपाय सांगितले. तेव्हा लक्ष्मीने बालीला राखी बांधून आपले भाऊ बनविले आणि आपल्या नवऱ्याला आपल्यासह घेऊन आल्या. त्या दिवशी श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी होती. तेव्हा पासूनच रक्षा बंधनाचा हा सण प्रचलित आहे.
 
4 यमराजाची बहीण : भाऊभिजेला यम द्वितीया असे ही म्हणतात. आख्यायिका आहे की या दिवशी यमुनाने आपला भाऊ यमराजाला आपल्या घरी निमंत्रण देऊन त्यांना टिळा लावून आपल्या हातून चविष्ट जेवण दिले होते. ज्यामुळे यमदेव फार खूश झाले होते आणि त्यांनी यमुनेला मृत्यूच्या भीतीने मुक्त होऊन तिला अखंड सौभाग्यवतीचे आशीर्वाद दिले. असे म्हणतात की या दिवशी जे भाऊ बहीण हा विधी पूर्ण करून यमुनेत अंघोळ करतात, त्यांना यमराज यमलोकात काहीही त्रास देत नाही. या दिवशी मृत्यूचे देव यमराज आणि त्यांची बहीण यमुनेची पूजा करतात.
 
5 रामाची बहीण : श्रीरामाच्या दोन बहिणी होत्या एक होती शांता आणि दुसरी कुकबी असे. इथे आम्ही आपल्याला शांता बद्दल सांगणार आहोत. दक्षिण भारतातील रामायणानुसार रामाच्या बहिणीचे नाव शांता होते, या चारही भावांमध्ये सर्वात थोरल्या असे. शांता ही राजा दशरथ आणि कौशल्याची मुलगी असे, पण जन्माच्या काही वर्षानंतर काही कारणावश राजा दशरथाने शांताला अंगदेशाच्या राजा रोमपदाला दत्तक दिलं होते. भगवान श्रीरामाच्या मोठ्या बहिणीचा सांभाळ राजा रोमपद आणि त्यांचा पत्नी वर्षिणी ने केले होते, राणी वर्षिणी महाराणी कौशल्याची बहीण म्हणजे श्रीरामाच्या मावशी होत्या. शांताचे पती एक महान ऋषी ऋंग असे.    
 
राजा दशरथाच्या तिन्ही राण्यांना काळजीत असायचा की त्यांना मूल नसल्यामुळे त्यांचा पश्चात उत्तराधिकारी कोण असेल. यांची काळजी दूर करण्यासाठी ऋषी वशिष्ठ त्यांना सुचवतात की आपण आपले जावई ऋषी ऋंग कडून पुत्रेष्ठि यज्ञ करवावं. हे केल्याने पुत्राची प्राप्ती होईल. ऋषी ऋंग यांनीच पुत्रेष्ठि यज्ञ केले होते. 
 
6 कृष्णाची बहीण : असे म्हणतात की नरकासुराला ठार मारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आपल्या बहीण सुभद्रेला भेटावयास भाऊ विजेच्या दिवशी त्यांचा घरी पोहोचतात. सुभद्रेने त्यांचे स्वागत करून आपल्या हाताने त्यांना जेवू घातले आणि टिळा लावला. सुभद्रेच्या व्यतिरिक्त श्रीकृष्णाला इतरही बहिणी होत्या. पहिली एकानंगा(या यशोदेची मुलगी असे), दुसऱ्या योगमाया(देवकीच्या गर्भेतून सती महामायाच्या रूपाने यांचा घरी जन्म घेतला),जे कंसाच्या हातातून सोडल्या गेल्या. म्हटले जाते की, विंध्याचल मध्ये याचं देवी वास्तव्यास आहे. असे म्हणतात की योगमायेने पावलोपावली श्रीकृष्णाला साथ दिला. या व्यतिरिक्त द्रौपदीला श्रीकृष्ण आपली बहीण मानायचे.
 
7 सूर्यदेवाची बहीण : भगवान सूर्यदेवाची बहीण आणि ब्रह्माजींची मानसपुत्री छठ मैयाच्या नावाने प्रख्यात आहे. नवरात्रीच्या   षष्टीला कात्यायनीच्या नावाने देखील ओळखतात. नवरात्राच्या षष्ठी तिथीला यांची पूजा करतात.
 
8 रावणाची बहीण : रावणाच्या दोन बहिणी होत्या. एकीचे नाव होते शूर्पणखा आणि दुसरीचे नाव होते कुंभिनी जी मथुरेच्या राजा मधू दानवाची बायको असे आणि दानव लवणासुराची आई होती.
 
9 कंसाची बहीण : सर्व दुर्गुणसंपन्न असून देखील कंस आपल्या लहान बहीण देवकीला खूप प्रेम करायचा आणि तिला सर्वात जास्त मानायचा. जर देवकीच्या लग्नाच्या वेळी आकाशवाणी झाली नसती, तर त्याने कधीही आपल्या धाकट्या बहिणीवर   अत्याचार केले नसते. देवकी ही राजा उग्रसेन आणि राणी पद्मावती यांची मुलगी होती.
 
10 दुर्योधनाची बहीण : कौरव म्हणजेच दुर्योधन आणि त्याचे 100 भाऊ, पण त्या कौरवांना एक बहीण होती, तिचे नाव असे दुशाला. तिचे लग्न सिंध देशाच्या राजा जयद्रथ ह्याच्याशी झाले होते. जयद्रथाचे वडील वृद्धक्षत्र होते. जयद्रथाने द्रौपदीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे द्रौपदीने त्याचे सर्व केश काढून त्याला अपमानित केले होते. याचं जयद्रथामुळे अभिमन्यूला पांडव चक्रव्युपासून वाचवू शकले नव्हते. त्याच प्रमाणे महाभारतात शकुनीची बहीण गांधारी आणि धृष्टधुम्नची बहीण द्रौपदी देखील प्रख्यात आहेत.
 
* वेबदुनियावरील दिलेल्या कोणत्याही सामग्रीच्या प्रकाशनासाठी लेखक/वेबदुनियाची परवानगी/मान्यता आवश्यक आहे, त्या शिवाय कोणतीही रचना किंवा लेख वापरण्यास मनाही आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रावण शुक्रवार विशेष: जिवतीच्या प्रतिमेचा भावार्थ