Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

तरावीहची नमाज

तरावीहची नमाज
, गुरूवार, 7 मे 2020 (16:13 IST)
कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ आहे. तो रमजान महिन्यातच अल्लाहतआलाने प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.) यांचेपर्यंत आपल्या खास फरिश्त्यामार्फत पोहोचविला. हजरत पैगंबरांनी फरिश्ता हजरत जिब्रईल अलै सलाम यांचेकडून शिकून घेऊन तो आपल्या अनुयायी लोकांपर्यंत पोहोच केला.
 
रमजानमध्येच कुरआन शरीफचे अवतरण पृथ्वीवर झाले. त्यामुळे रमजान महिन्यात जगातील प्रत्येक मशिदीत दररोज रात्रीच्या नमाजे तरावीहमध्ये कुरआन पठण केले जाते. रमजानमध्ये रोजा आणि  कुरआन पठाणाला जसे महत्त्व आहे तसेच नमाजला सुद्धा खूप वरचे स्थान देण्यात आले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व नमाज अदा करावीच लागते. यशिवाय रात्री इशाच्या नमाजला जोडूनच तरावीहची वीस रकाआतीची अतिरिक्त नमाजही पढणे सर्वांना वाजिब (सक्तीचे) करण्यात आलेले आहे. रमजानमध्ये पहिल्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यापासून अगदी महिनाअखेरर्पंत दररोज रात्री तरावीहची नमाज पढावी लागते. 
 
ही नमाज मशिदीत जाऊन जातीसह म्हणजेच सामुदाकिरीत्या अदा करणे जरुरीचे आहे. याचे पुण्यही अधिक आहे. तरावीहची नमाज फक्त रमजानमध्ये होत असते. हे या महिन्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. तरावीहची नमाज सर्व नमाजांमध्ये मोठी असल्याने उपवासधारकांची खरोखर कसोटी लागते. आळस, कंटाळा करून अजिबात चालत नाही. मगरीबची मनाज झाल्यावर उपवास सोडल्यानंतर तहान-भुकेने वकूळ झालेले केलेले उपवासधारक पोटभर भोजन केले असतात. ते सर्व भोजन तरावीहच्या नमाजने पचून जाते. आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदाक ठरते. मानवजातीला जगण्याची उचित दिशा दाखविणारे पवित्र कुरआन रमजान महिन्यातच अवतरले असल्यामुळे नियमितपणे कुरआन पठण करणे ही खूप महत्त्वाचे आहे. तरावीहच्या नमाजमधून कुरआन पठण सुरू असते. ‘तरावीह'मध्येच सव्वा अध्यायाचे पठण केले जाते. तरावीहची नमाज हाफिजच्या पाठीमागे पढावी लागते. हाफीजला संपूर्ण कुरआन  मुखोद्‌गत असते. या महिन्यात उपवासकर्त्यांना एकीकडे आपले दैनंदिन कामकाज तर पार पाडावेच लागते शिवाय रोजा, नमाज, कुरआन पठणही निमित्ताने करावे लागते. दिवसभराच्या वेळापत्रकानुसार सर्व कामे व्यवस्थितपणे पार पाडावीच लागतात. आपल्या पालनकर्त्यावर श्रद्धा आणि निष्ठा असेल तर तो वेळेचे गणित कधीच बिघडू देत नाही. सर्व गोष्टी सुरळीतपणे, निर्विघ्नपणे पार पाडतात. रोजेधारकांनी या महिन्यात केलेल्या त्यागाची, उपसलेल्या अथक कष्टाची अल्लाह ताबडतोबीने दखल घेतो. या उपासनेचे पुण्य तो स्वतःच हाताने बंद्यांना प्रदान करतो. पुढील अकरा महिन्यांची बंद्यांची जबाबदारी अल्लाह स्वतःवर घेतो. त्यांना कमाई मुबलकता आणि बरकत देतो. कोरोनाच्या साथीमुळे कोणतीही नमाज असो कुणीही मशिदीत जाऊ नये. घरातच नमाज पढावी. 
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वैशिष्ट्ये मुस्लिम धर्माची