Festival Posters
✕

केव्हा आहे ईद-उल-फितर 2024

Webdunia
मंगळवार, 9 एप्रिल 2024 (20:30 IST)
Ramadan Eid Ul Fitr 2024: या दिवसांमध्ये रमजान सुरु आहे आणि रमजान महिन्याचा कारवा ईद उल-फ़ित्र पर्यंत येऊन पोहचला आहे. इस्लाम धर्म अनुसार रमजान इस्लामी कॅलेंडरचा नववा महिना आहे. या पूर्ण महिन्यामध्ये रोजे ठेवले जातात. हा महिना संपताच दहावा महिना शव्वाल सुरु होतो. 
 
या महिन्याची पहिली रात्र ईदची चंद्र रात्र असते. चंद्र दिसल्यानंतर ईद उल-फ़ित्र हा सण साजरा केला जातो. या वर्षी म्हणजे वर्ष 2024 मध्ये ईद-उल-फितरचे पर्व 10 किंवा 11 एप्रिलला साजरे केले जाऊ शकते. याला मीठी ईद आणि ईद अल फितर च्या नावाने ओळखले जाते. 
 
तुम्हाला माहित आहे का ईद-उल-फितर मुस्लिम समाजासाठी खूप पवित्र पर्व मानले जाते. या रात्रीची वाट वर्षभरापासून पाहिली जाते, कारण या रात्री दिसणाऱ्या चंद्रापासून इस्लाम समाजाच्या सर्वात मोठा सण ईद उल-फ़ित्र ची घोषणा होते. या प्रकारे हा चंद्र ईदचा संदेश घेऊन येतो. या चंद्र रात्रीला अल्फा संबोधले जाते. 
 
ईद उल-फ़ित्र/ ईद-उल फितर हा सण अल्लाची देणगी आहे, आनंदी बातमीचा सुगंध आहे, आनंदाचा पुष्पगुच्छ आहे. हास्याचे वातावरण आहे. वैभवाचा सण आहे. 
 
याकरिता ईदचा चंद्र दृष्टीस पडता, वातावरणात उत्साह निर्माण होतो. ईदच्या दिवशी शेवया किंवा खीरखुर्मा याने तोंड गोड केल्यानंतर लहान-मोठे, परके-आपले, मित्र-दुश्मन एकमेकांना गळा भेट देतात. चारही बाजूने प्रेम वर्षाव होतो. 
 
एक पवित्र आनंदने चमकणारे सर्व चेहरे माणुसकीचा संदेश वातावरणात पसरवून देतात. अल्लाला प्रार्थना करतात. रमजानचे रोजे आणि उपासनेची हिम्मतसाठी अल्लाला धन्यवाद करण्यासाठी हात सर्वीकडे दिसायला लागतात. हा उत्साह पुरावा देतो की ईद आली आहे. 
 
रमजान महिन्याचे रोजेला एक कर्तव्य सांगितले गेले आहे. म्हणजे मनुष्याला अन्न आणि पाण्याचे महत्व कळेल. भौतिक वासना आणि लालच पासून मनुष्य दूर होईल. मनुष्य कुरआनच्या अनुसार आपल्यामध्ये बदल घडवेल. 
 
याकरिता रमजानचा महीना मनुष्याला अशरफ आणि आला बनवण्याचे वातावरण आहे. इस्लामचा संदेश आहे की, जर अल्लाची खरोखर प्रार्थना करायची असेल तर सर्व माणसांवर प्रेम करावे. तसेच नेहमी मदतगार बनावे. हीच खरी प्रार्थना आहे. तसेच ईदचा खरा आनंद यामध्येच आहे.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

अक्षय नवमी २०२६: १८ नोव्हेंबर रोजी करा 'हे' खास उपाय; भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने घरात नांदेल अखंड समृद्धी!

आवळा नवमी २०२६: तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या!

मारुतीरायाची कृपा प्राप्त करण्यासाठी मंगळवारी या प्रकारे आराधना करावी

श्री सद्गुरु शंकर महाराजांची आरती

Gopashtami 2026: आज गोपाष्टमी, पूजा शुभ मुहूर्त आणि गाईला काय खायला द्यावे? जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments