Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनामुक्त गावात 10वी-12वी वर्ग सुरू होणार !

10th-12th class will start in Coronafree villages in Maharashtra
, बुधवार, 23 जून 2021 (12:16 IST)
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे इयत्ता 10वी (SSC)आणि 12वीचे (HSC)वर्ग कोरोनामुक्त झालेल्या गावांत सुरू करण्यात येऊ शकतात का याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठकही संपन्न झाली. राज्यात कोरोनामुक्त गावात दहावी, बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पहावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. 
 
जी गावे गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता 10 आणि 12 वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पहाण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
 
या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
बारावी परीक्षा मूल्यांकन निकषांबाबत
बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणांचे मूल्यांकन करताना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या मूल्यांकनाच्या धर्तीवर आणि राज्याने दहावीच्या मूल्यांकन बाबत जी पद्धत निश्चित केली आहे. या सगळ्याचा तुलनात्मक अभ्यास करूनच बारावी विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत निकष ठरवून याबाबत अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत शिक्षण विभागाला सांगितले आहे
 
कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे अशी माहिती प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Delta Plus Variant: धोकादायक डेल्टा प्लस व्हेरियंटची कोरोनाची तिसरी लाट? अशा सर्व प्रश्नांवर तज्ज्ञांची उत्तरे