Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा ढकलल्या, आता ऑगस्ट महिन्यात

exam
, गुरूवार, 20 जुलै 2023 (11:35 IST)
10th and 12th supplementary exams postponed अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. आता एक अजून निर्णय जाहीर करण्यात आला असून त्याप्रमाणे इयत्ता दहावी आणि बारावीच्या जुलैमध्ये होणार्‍या पुरवणी परीक्षांच्या नियोजित तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता या परीक्षा ऑगस्ट महिन्यात होणार आहेत.
 
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे राज्य सरकारनं गुरुवारी म्हणजेच २० जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर केली. तसेच राज्य शिक्षण मंडळाने याच दिवशी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या परीक्षांचं सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.
 
राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळे दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे २० जुलै रोजी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले. दहावीचे पुढे ढकलण्यात आलेले पेपर २ ऑगस्ट रोजी होतील तसेच बारावीचे पेपर ११ ऑगस्ट रोजी होतील.
 
परीक्षेची वेळ सकाळी अकरा ते दुपारी दोन अशी निश्चित करण्यात आलेली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rainfall Alert शाळा बंद राहतील, मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा