Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

11 वर्षीय मुलीवर रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षका ने बलात्कार केला, आरोपीला अटक

11-year-old girl raped by hospital security guard
, शनिवार, 15 जानेवारी 2022 (23:28 IST)
दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव, केंद्रशासित प्रदेशातील दमण जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी रुग्णालयाच्या एका सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. दमण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी तिच्या आईसोबत होती, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मारवाडच्या सरकारी रुग्णालयात 11 जानेवारी रोजी ही घटना घडली. आरोपीने मुलीला पाणी देण्याच्या बहाण्याने निर्जन खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक रुग्णालयात पोहोचले, असे अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा रक्षक फरार होता, म्हणून आम्ही अनेक पथके तयार केली आणि काल रात्री तो जिल्ह्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना बसस्थानकातून त्याला अटक केली.आरोपीचे नाव प्रशांत कुमार असून तो मूळचा बिहारचा आहे.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,  स्थानिक न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. पुढील तपास सुरू आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कारने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार ठार, कार चालक पसार