Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समृद्धी महामार्गावर वैजापूर जवळ भीषण अपघातात नाशिक मधील 12 भाविक ठार तर 14 जखमी

Webdunia
सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (08:16 IST)
समृद्धी महामार्गावरील वैजापूर जवळील जांबरगाव टोल नाक्याजवळील चैनल नंबर 483 येथे 2 वाजेच्या पूर्वी टेम्पो ट्रॅव्हल क्रमांक MH 20 GP 2212 व ट्रक क्रमांक MP 09 MH 6483 यांचा अपघात झाला असून दोन्ही वाहने हे छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डीच्या दिशेने जात होते. समोरील ट्रकला ट्रॅव्हल्स ने पाठीमागून धडक बसल्यामुळे सदरचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे.
 
टेम्पो ट्रॅव्हल्स मधील प्रवासी हे बुलढाणा येथील सैलानी बाबा यांचे दर्शन घेऊन शिर्डी कडे जात होते. या भीषण अपघातात नाशिक जिल्ह्यातील 12 भाविक ठार झाले आहे तर 14 जण जखमी आहे, यात 1 पाच वर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे, यातील मयत आणि जखमी सर्व नाशिक परिसरातील असून गांधीनगर, राजीवनगर, निफाड, जेलरोड असे आहेत.
 
सर्व जखमींवर वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे जखमींची विचारपूस करण्याकरता शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत, तर जखमीनी RTO अधिकाऱयांना दोषी धरले असून RTO च्या गाडीने या ट्रकला अडवले असता अचानक हा अपघात घडला असे आरोप केले आहेत त्यामुळे ती सुद्धा चौकशी सुरु आहे.
 
मृतांची नावे-
 
१) तनुश्री लखन सोळसे, वय -५वर्षे
 
२) संगीता विलास आसवले (४० वर्ष)
 
३) अंजबाई रमेश जगताप (३८वर्षे)
 
४) रतन जमदाडे (४५वर्षे )
 
५) काजल लखन सोळसे (३५वर्षे )
 
६) रजनी गौतम तपासे (३८वर्षे )
 
७) हौसाबाई आनंदा शिरसाठ (७०वर्षे )
 
८) झुंबर काशीनाथ गांगुर्डे (५०वर्षे )
 
९) अमोल झुंबर गांगुर्डे (१८वर्षे )
 
१०) सारिका झुंबर गांगुर्डे (४०वर्षे )
 
११) मिलिंद पगारे (५०वर्षे )
 
१२) दीपक प्रभाकर केलाने (४७ वर्षे )
 
जखमींवर घाटी रुग्णालयात व वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.घाटी रुग्णालयात कंट्रोल युनिट तयार असून त्याचा क्रमांक 0240-2402409 असा असल्याचे RMO Dr. अन्सारी यांनी कळविले आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपचा आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

पुढील लेख
Show comments