Dharma Sangrah

12 वी च्या विद्यार्थ्यांना आज मिळणार हॉल तिकीट

Webdunia
शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (12:49 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे सर्व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र स्टेटबोर्डाच्या विद्यार्थ्यांना आज पासून हॉल तिकीट मिळणार अशी माहिती महाराष्ट्र बोर्डाकडून देण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजे पासून www.mahahssscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध असेल तसेच कॉलेज लॉगिन मधून देखील हे प्रवेश पत्र उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रत काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिका आणि स्वाक्षरी करून घ्यावी. या हॉलतिकिटांमध्ये काही त्रुटी किंवा दुरुस्ती असल्यास विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करायचा आहे. हॉल तिकिटात फोटो, स्वाक्षरी विद्यार्थ्यांचे नाव इत्यादी मध्ये त्रुटी किंवा दुरूस्ती असल्यास उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे तातडीनं पाठवायची अशी सूचना बोर्डाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचं प्रवेशपत्र गहाण झाल्यावर संबंधित  उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांनी पुन्हा प्रत काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असे नमूद करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. 
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारने एका आठवड्याच्या आत वादग्रस्त आरटीआय नियम मागे घेतला

महाराष्ट्र सरकारने एका आठवड्याच्या आत वादग्रस्त आरटीआय नियम मागे घेतला

लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा; विवाहापूर्वीच होणाऱ्या पत्नीने रचला हत्येचा कट

नवी मुंबईत 5575कोटी रुपये खर्चाच्या दोन नवीन मेट्रो मार्गांना मंजुरी, विमानतळाला थेट कनेक्टिविटी मिळणार

मनसेला जागा मिळू नये म्हणून राजूल पाटील यांना तिकीट दिले: संजय दिना पाटील

पुढील लेख
Show comments