Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

गडचिरोली जिल्ह्यातील 13 गावांनी बंद केले नक्षलींचे धान्य-पाणी, केला नक्षली परिसरात गांव बंदीची घोषणा

गडचिरोली जिल्ह्यातील 13 गावांनी बंद केले नक्षलींचे धान्य-पाणी, केला नक्षली परिसरात गांव बंदीची घोषणा
, मंगळवार, 25 जून 2024 (11:42 IST)
महाराष्ट्राचे नक्षल प्रभावित 13 गावांनी नक्षलींचे धान्य, पाणी बंद केले आहे. सोबतच विस्फोटक समान देखील गावातील लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये जमा केला आहे.
 
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलीं विरुद्ध13 गावांनी एक योजना सुरु केली आहे. 13 गावातील ग्रामिणांनी नक्षलींचा विरोध करत आपल्या गावातून नक्षलींचे धान्य-पाणी देणे बंद केले आहे. या गावांतील लोकांनी नक्षली गांव बंदीचा  प्रस्ताव सुरु करत आपल्या आपल्या घरामध्ये ठेवलेले विस्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
 
गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, 13 गावांनी आज एक जुट होऊन नक्षलीं विरोधात गाव बंदीची घोषणा केली आहे. त्यांनी नक्षलींना जेवण, धान्य आणि पाणी न देण्याची घोषणा केली आहे. 
 
गडचिरोली मधील या 13 गावांचे नाव नालगुंडा, कुचेरा, कवंडे, गोंंगवाडा, मिलदापल्ली, महाकापाडी, कोयर, आलदंडी, मुरूंगल, गोपणार, मोरडपार, भटपार, परायणार आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवार बजेटमध्ये शेतकरी, ओबीसी आणि महिलांना निवडणूक खुश करु शकतात