Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टेस्ट ड्राईव्हसाठी नेलेल्या 19 लाखांच्या ई-कारचा अपहार

Webdunia
गुरूवार, 24 ऑगस्ट 2023 (07:35 IST)
19 lakh e-car taken for test drive stolen  टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली घेऊन गेलेल्या 19 लाख रुपये किमतीच्या ई-कारचा अपहार करणाऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कपिल अशोक नारंग (वय 41, रा. सिरीन मेडोज, गंगापूर रोड, नाशिक) यांचे पाथर्डी फाटा येथे कार मॉल आहे.
 
या कार मॉलमध्ये आरोपी मनोज प्रकाश साळवे (रा. नाशिक) हा काल (दि. 22) दुपारी दीड वाजेच्या सुमारास आला. त्याने जीजी 26 एबी 4848 या क्रमांकाची 19 लाख रुपये किमतीची एमजी इलेक्ट्रिक निळ्या रंगाची कार फिर्यादी कपिल नारंग यांचा विश्वास संपादन करून टेस्ट ड्राईव्हसाठी नेली; मात्र बराच वेळ होऊनही मनोज साळवे याने ड्राईव्हसाठी नेलेली कार परत न आणता तिचा अपहार केला.
 
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात साळवेविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

मदरशात 12 वर्षांच्या मुलीवर मौलानाने केला बलात्कार, सुट्टीनंतर केले घृणास्पद कृत्य

महिला फ्लाइंग ऑफिसरचा विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप, हवाई दलाने सुरू केली चौकशी

राष्ट्रपतींना पत्र लिहून केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची भाजपच्या आमदारांची मागणी

Honda Activa EV लॉन्च डेट निश्चित झाली , मायलेज आणि वैशिष्ट्यांमध्ये पेट्रोलपेक्षा एक पाऊल पुढे

श्रीलंकेने 10 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकला

पुढील लेख
Show comments