महाराष्ट्र पोलीस दलात काही पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबतचे लवकरच आदेश निघणार आहेत. पोलीस महासंचालक पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर संजय पांडे ) यांनी पोलीस दलातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. विशेष म्हणजे राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्ह) माध्यमातून राज्यातील अनेक पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिले. याच दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक बदल्यांसंदर्भात विचालेल्या प्रश्नाला पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी उत्तर देताना लवकरच प्रमोशन ऑर्डर निघेल असे सांगितले.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांना API ते PI किती पदे भरली जातील असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, API ते PI कमीत कमी 190 जणांना प्रमोशन मिळणार आहे. 190 पोलिस निरीक्षकांचे पोलीस उपअधीक्षक (DYSP) प्रमोशन होणार आहे. त्याची ऑर्डर येत्या 10 दिवसांत निघेल असे त्यांनी सांगितले. तसेच नवीन भरती संदर्भात बोलताना 12 हजार जणांची भरती केली जाणार असल्याचे सांगितले.
याच दरम्यान पोलिसांच्या 12-12 तास ड्युटीच्या प्रश्नावर देखील मार्ग काढत असल्याची माहिती त्यांनी दिली. संजय पांडे म्हणाले, पोलिसांनी 12 तास ड्युटी केल्यानंतर त्यांना 24 तास आराम मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
तसेच फेसबुक लाईव्ह माध्यमातून एका पोलिसाने 2011 च्या सागरी पीएसआय (PSI) बॅचच्या प्रमोशनची विनंती प्रलंबित असल्याची विचारणा केली.
त्यावर पांडे यांनी संबंधित पोलीस अधीक्षक (SP) यांच्याकडून माहिती घेऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली.