rashifal-2026

बीडमध्ये 2 शेतकऱ्यांची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (09:33 IST)
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे खूप नुकसान झाले आहेत. मागील काही दिवसांपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे. यामुळे अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असताना बीडमधून दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. 
 
अतिवृष्टीमुळे शेतीचं झालेलं नुकसान सहन न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. भाऊसाहेब दशरथ पांढरे (वय-55) आणि योगेश वसंत खांडवे (वय-24) असं आत्महत्या करण्याऱ्या दोन शेतकऱ्यांची नावं आहेत. 
 
भाऊसाहेब पांढरे हे गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील रहिवासी होते. ते अल्पभूधारक शेतकरी होते आणि त्यांनी घर बांधणीसाठी कर्ज घेतलं होतं. याशिवाय बँकेतून पीककर्ज देखील घेतलं होतं. पण अतिवृष्टीमुळे यांची पिकासह शेती खरडून वाहून गेली. आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतात कापूस आणि सोयाबीनचं नुकसान झालं. नैराश्यात पांढरे यांनी 1 ऑक्टोबर रोजी दुपारी आपल्या घराजवळील एका झाडाला गळपास घेऊन जीवन संपवलं. 
 
तर दुसऱ्या एका घटनेत कर्जाखाली दबून योगेश वसंत खांडवे या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं समजतं. खांडवे यांनी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आयुष्य संपवलं. या दोन्ही घटनांमुळे गावात शोककळा पसरली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

LIVE: रोहित पवार यांच्या 'षड्यंत्र'च्या दाव्यांमुळे विमान वाहतूक मंत्रालय संतापले

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात एक अनोखी कामगिरी केली

शिवनेरी किल्ल्यावर प्रचंड गर्दी, एक भाविक घसरला ज्यामुळे इतर जण पायऱ्यांवर पडले; पोलीस म्हणाले- चेंगराचेंगरी झाली नाही

मथुरा येथे भरधाव वेगाने जाणारी कार डिव्हायडरला धडकून कालव्यात पडली, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; ४४ नक्षल स्मारके पाडली

पुढील लेख
Show comments