Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अहमदाबाद एअर इंडियाच्या विमान अपघातात नागपूरच्या 2 वर्षाच्या रुद्रचा दुर्देवी मृत्यू

Ahmedabad plane crash
, शुक्रवार, 13 जून 2025 (18:26 IST)
अहमदाबाद एअर इंडियाच्या विमान अपघातात नागपूरच्या यशा कामदार, तिचा मुलगा रुद्र आणि सासू रक्षा मोधा हे देखील होते. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला आहे. अपघाताची बातमी मिळताच नागपूर येथील कुटुंबाला धक्का बसला आहे.
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. या अपघातात नागपूरच्या यशा कामदार त्यांची सासू  रक्षा मोधा आणि 2 वर्षाचा मुलगा रुद्र हे देखील प्रवास  करत होते दुर्देवाने हे तिघे अपघाताला बळी पडले. 
ALSO READ: सोलापूरच्या वृद्ध दाम्पत्यासाठी लंडनमधील मुलाला भेटण्यासाठीचा प्रवास शेवटचा ठरला
कुटुंबातील सदस्यांना ही माहिती कळतातच यशाचे वडील मनीष कामदार हे त्यांच्या नातेवाईकांसह रस्त्यामार्गे अहमदाबादला रवाना झाले. अपघाताची माहिती कळतातच नातेवाईकांमध्ये आणि शेजारऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 
 
कामदारांच्या नातेवाईकांनी सांगितले की, यशाचे लग्न अहमदाबाद मध्ये झाले असून ती लंडन मध्ये वास्तव्यास होती. तिच्या सासू रक्षा मोधा आणि मुलगा रुद्र हे देखील विमानात तिच्यासह होते. तिची सासू पोरबंदरमध्ये राहत होत्या. सर्व जण बिझिनेस क्लास मधून प्रवास करत होते. 
ALSO READ: महाराष्ट्र एनसीपी अध्यक्षांच्या जवळच्या नातेवाईकाचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू
यशा लंडन राहायच्या 2 महिन्यांपूर्वी त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्यामुळे त्या भारतात आल्या आणि काही काळ इथेच होत्या.व्हिसा आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी यशा लंडन जात असताना हा दुर्देवी अपघात घडला. 
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विम्बल्डनच्या बक्षिस रकमेत वाढ, विजेत्याला आता मिळणार इतके कोटी रुपये