Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सांगली मध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी २२ वर्षे सश्रम कारावास आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा

court
, शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (09:19 IST)
सांगलीमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी माधवनगर येथील एका तरूणाला जिल्हा सत्र न्यायालयाने  22 वर्षे सश्रम कारावास आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा गुरूवारी ठोठावली. दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. आरोपी वासुदेव उर्फ रोहित चव्हाण (वय 27, रा. माधवनगर) याने नातेवाईक असलेल्या पिडीतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेउन तिच्यावर 1 फेब्रुवारी ते 20 मार्च 2021 या कालावधीत मिरजेतील समतानगर परिसरात भाड्याच्या खोलीत अत्याचार केले.

पीडीतेच्या आजीला व वडिलांना ठार मारण्याची धमकी देत त्याने लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी पिडीतेच्या आजीने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीसांनी या प्रकरणाचा तपास करून संशयित आरोपी विरूद्ध जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी.एस. हातरोटे यांनी संशयित आरोपीला दोषी ठरवून 22 वर्षे सश्रम कारावास आणि 50 हजार रूपये दंड अशी शिक्षा  सुनावली.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे जिल्ह्यातील 16 इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद