Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परीक्षेला जाणाऱ्या 3 विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

3 students dies in road accident in Jalna
, शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (16:15 IST)
जालना येथील घनसावंगी येथे शुक्रवारी एका भीषण अपघात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर येत आहे. सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे. 
 
अंबर रोडवर सकाळी विद्यार्थी असलेली कार घनसावंगी येथील पेट्रोल पंपासमोर जात असताना समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे नियंत्रण सुटले. ज्यामुळे कार रस्त्यालगतचं पलटली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील आणखी एका व्यक्तीला जबर मार लागल्याने त्याला जालना येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. 
 
अपघातात गाडीचेही संपूर्णपणे नुकसान झाले आहे. अपघातात मृत्यू पावलेले तिघेही विद्यार्थी आहेत. आरती मिरकर (वय 25) सुनील जाधव (वय 30) आणि वंदना राजगुरू (वय 24) असं या तिघांचं नाव आहे. शिक्षण घेत असलेले हे तिघेही टायपिंगची परीक्षा देण्यासाठी निघाले होते. जखमीला उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वारंवार सांगतो, तुटेपर्यंत ताणू नका : अनिल परब