Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

समृद्धी महामार्गवर 3 ट्रकची धडक, एकाचा मृत्यू , 2 जखमी

accident
, शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2025 (11:37 IST)
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. या अपघात 3 ट्रक एकमेकांना धडकले आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.  समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणे ट्रक थांबवणे एका ट्रक चालकाला महागात पडले. रस्त्यावर उभे असलेल्या दोन ट्रकला मागून येणाऱ्या तिसऱ्या ट्रक ने जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोन ट्रक चालक गंभीर जखमी झाले. 
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही ट्रक मुंबईहून नागपूरच्या दिशेने येत असताना एका ट्रक चालकाने त्याचा ट्रक गांधी खापरी परिसरात समृद्धी चॅनल येथे उभारला होता. त्या ट्रकच्या मागे एक अजून ट्रक उभारला होता. नो पार्किंग झोन मध्ये हे ट्रक उभे होते. 
गुरुवारी सकाळी तिसरा ट्रक मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात असताना ट्रक चालकाला रस्त्यावर अंधार असल्याने दोन्ही उभे ट्रक दिसले नाही आणि ट्रक जाऊन धडकला. धडक एवढी जोरदार होती की दोन्ही ट्रकच्या केबिन पूर्णपणे चिरडल्या गेल्या आणि ट्रकचा क्लिनर त्यात अडकून गंभीर जखमी होऊन तिथेच मरण पावला. तर इतर दोघे ट्रक चालक गंभीर जखमी झाले. 
अपघाताची माहिती मिळतातच हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले पहिल्या ट्रकचालकाने आपले ट्रक तिथून पळवून नेले. या प्रकरणी तिन्ही ट्रक चालकांच्या विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 
 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपुरात दाम्पत्याने एका व्यावसायिकाला 2.32 लाख रुपयांने गंडवले, गुन्हा दाखल