Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

चिमुरडीच्या पोटातून 32 इंच लांबीचा केसांचा पुंजका

चिमुरडीच्या पोटातून 32 इंच लांबीचा केसांचा पुंजका
मुंबईतल्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून अवघ्या दहा वर्षांच्या चिमुरडीच्या पोटातून 32 इंच लांबीचा केसांचा पुंजका बाहेर काढण्यात आला आहे. गेल्या वर्षांपासून या मुलीला स्वतःचेच केस खाण्याचा विकार जडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगभरातील वैद्यकीय इतिहासात आतापर्यंत अशाप्रकारच्या 120 पेक्षाही कमी केसेसची नोंद झाल्याची माहिती आहे.
 
दिवसातून एकदा तरी तिला मळमळायचं, असं तिच्या वडिलांनी सांगितलं. परीक्षेच्या भीतीमुळे हे होत असावं, असा अंदाज तिच्या पालकांनी बांधला. तिने खाणं-पिणंच बंद केल्यामुळे अखेर आई-वडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
 
बालिकेला ट्रायकोटिलोमेनिया (हेअरपुलिंग डिसॉर्डर) आणि ट्रायकोफेगिया (रापुंझेल्स सिंड्रोम) झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःचेच केस तोडून खाते. केसांच्या पुंजक्याचा आकार पाहता ती बऱ्याच वर्षांपासून ते खात असावी, असा डॉक्टरांचा अंदाज  आहे. बालिकेला समुपदेशनासाठी पाठवण्यात आलं आहे. ताण-तणावातून हा विकार जडत असल्याचं मानसशास्त्रीय संशोधन आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फेसबुकचे भारतामध्ये नवे फिचर 'मार्केटप्लेस'