Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाघिणीच्या बछड्यांना पकडण्यासाठी अंजी भागात चार हत्ती, तारेचे कुंपण

yavatmal
यवतमाळ जिल्यातील मोहदा राळेगाव भागातील टी 1 वाघिणीच्या दोन बचड्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाची अंजी परिसरात आज सकाळी पासून मोहीम तेज केली आहे .मध्यप्रदेशातील कान्हा अभियारण्यातील शिवा, पवनपुत्र,  चंचलकली, हिमालय या  चार हत्तीवर दोन पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पथक बसून त्यांच्या साहाय्याने मोहीम यशस्वी करण्याचे प्रयत्न वनविभाग करीत आहे.

अंजी या परिसरातील संपूर्ण 80 एकर परिसरात जिथे तार कुंपण सह कापडी कुंपण सुध्दा केले आहे . त्या भागातील अंजी परिसरात वनअधिकारी आणि कर्मचारी वगळता कुणालाही जाण्यास बंदी करण्यात आले आहे. या जंगल भागात जाण्यासाठी असलेल्या सर्व रस्ते व पांदनरस्ते या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.2 नोव्हेंबरच्या मध्यरात्री टी 1 वाघिणीला ठार केल्यानंतर तिच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्याची मोहीम  राबविण्यात येत आहे.

दोन या बछड्यांना आधी स्वतः शिकार करण्यासाठी सहज छोटे भक्ष अनेक ठिकाणी ठेवत एकाच जागेवर ठेवण्यात आले.टी 1 वाघीण ठार झाल्या नंतर बचड्यांवर लक्ष ठेवण्यात आले .आता ते दोन बछडे स्वतः शिकार करू शकतात.अशा प्रकारच्या शाश्वती मिळल्या नंतर आता बचड्याना 24 डिसेंबर पर्यंत त्यांना पकडण्यासाठी एक डेडलाईन वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी  कडून ठेवण्यात आली आहे.त्यानुसार काल सायंकाळच्या सुमारास मुख्य वनसंरक्षक  उपवनसंरक्षक के. अभरणा, वन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची अंजी परिसरातील या दोन बछडे ( सी1-नर, सी2- मादी ) पकडण्यासाठी बैठक घेण्यात आली .

या बैठकीच्या निर्देशानुसार पासूनच या दोन बछड्यांना ट्रेकुलाइस करून जेरबंद करण्याची मोहीम आखण्यात आली आहे.या परिसरामध्ये चार हत्ती हत्तीवरून पाच ते सहा व्हेटर्नरी डॉक्टर यांचे दोन पथक तयार करून  जंगलामध्ये शोध घेत त्यानां जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत .

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लातूरला १२ दिवसाआड पाणी मिळण्याची शक्यता