Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या कारचा अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 28 मार्च 2022 (16:48 IST)
अमरावती- लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाचा अपघात झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात नांदगावपेठ-देवलगाव रिंगरोडवर घडला. माहितीनुसार ट्रक आणि कार यांची धडक एवढी भीषण होती की, कारचा चुरा झाला तर ट्रकची पुढील दोन्ही चाके निघून गेली. अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. 
 
अंजनगाव सुर्जी गावातील रहिवासी हे कुटुंब एका लग्न समारंभासाठी वाळगावमार्गे नांदगावपेठ येथे जात असताना पोटे कॉलेजजवळ कार आली असताना चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकशी कारची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ट्रक विजेच्या खांबाला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जाऊन पडला. तर कारचा चुरा झाला. 
 
अपघातात चार जणांचा मृत्यू जागीच झाला होता, एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी ट्रकचालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला. आरोपींचा शोध सुरू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments