Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील कारागृहातून 50 टक्के कैदी सोडा

50 per cent
, मंगळवार, 12 मे 2020 (16:32 IST)
कोरोना व्हायरसमुळे राज्यातील कारागृहातील 50 टक्के कैदी सोडण्याचा निर्णय राज्याच्या हाय पॉवर कमिटीने घेतला आहे. काहीदिवसांपूर्वीच राज्यातील कारागृहातील तब्बल चार हजार कैद्यांना सोडण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात  आला होता.
 
राज्यात 48 जेल आहेत. या जेलमध्ये एकूण 35 हजार 239 कैदी आहेत. यापैकी 50 टक्के कैद्यांना सोडणार आहेत, असा निर्णय राज्याच्या हाय पॉवर कमिटीने घेतला आहे. ज्या व्यक्तीला सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते आणि ज्यांना सात वर्षांची शिक्षा झाली आहे अशा कैद्यांना पेरोल, जामीन किंवा तात्पुरता जामीनावर सोडा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
 
मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह ही पाच कारागृह बंद ठेवण्यात आली आहे. जोपर्यंत वरिष्ठांकडून आदेश येत नाही तोपर्यंत अनिश्चित काळासाठी ही पाच कारागृहे लॉकडाऊन राहणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतात 'या' औषधाच्या क्लिनिकल चाचण्या झाल्या सुरु