मुंबईच्या आयआयटी महाविद्यालयाला याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून 57 कोटी रुपयांची घसघशीत देणगी मिळाली आहे. या महाविद्यालयाला ही आतापर्यंतची मिळालेली सर्वात मोठी देणगी मानली जात आहे. हे विद्यार्थी 1998 मध्ये या महाविद्यालयातून उत्तीर्ण झाले होते. 1998 च्या बॅचचे यंदा रजतमहोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने ही देणगी देण्यात आली आहे.
1998 च्या वर्षातील 200 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ही देणगी दिली. या 200 विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार आणि इच्छेनुसार या देणगीत त्यांचे योगदान केल्याची माहिती देण्यात आली. या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण आता उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्यात जागतिक पातळीवरील काही नावाजलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
व्हेक्टर कॅपिटल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनुपम बॅनर्जी, सिल्व्हर लेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अपूर्व सक्सेना, ग्रेट लर्निंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन लाखमराजू, पीक एक्सव्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंग, अमेरिकाज एचसीएल कंपनीचे मुख्य वृद्धी अधिकारी श्रीकांत शेट्टी आणि इंडोव्हान्स कंपनीचे सहव्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश जोशी तसेच इतर अनेक कंपन्यांचे अधिकारी यांचा देणगीदारांमध्ये समावेश आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांनीही काही महिन्यांपूर्वी अशीच मोठी देणगी मुंबई आयआयटीसाठी दिली होती. ती साधारणत: 41 कोटी रुपयांची होती. मात्र या नव्या देणगीमुळे हा विक्रम मागे पडला आहे.
Edited By-Ratnadeep Ranshoor