नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याने 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता बीडमधील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ कोविंड रुग्णालयात अर्धा तास ऑक्सिजन खंडित झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. नातेकवाईकांनी याबद्दल रुग्णालयावर आरोप केला आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा अर्धा तास खंडित झाल्याने सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने दावा फेटाळून लावला आहे.
तसंच परळी येथील कोविड सेंटरमधील ऑक्सिजन साठा संपल्याने रुग्णांचे हाल होत आहे. बीड जिल्ह्यात वाढती कोरोनाची रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर देखील ताण पडला आहे. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 9700 आहे. तर एकूण कोरोनाबाधित 42270 इतकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 760 जणांचा मृत्यू झाला आहे.