Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टीडीपीचे 60 नेते, हजारो कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश

60 TDP leaders
, मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 (09:50 IST)
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षातील  महत्त्वाचे 60 नेते  आणि हजारो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या नेत्यांमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावरील अनेक मोठी नावं आहेत. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश  पार पडला. तेलंगणातील नेते भाजपात येणं हे आंध्रसाठीही चांगले संकेत आहेत, अशी प्रतिक्रिया टीडीपीतून काही दिवसांपूर्वी भाजपात आलेले लंका दिनकर यांनी दिली.
 
हजारोंच्या संख्येने जिल्हा स्तरावरील कार्यकर्ते भाजपात आले आहेत. जवळपास 20 हजार कार्यकर्त्यांनी टीडीपी सोडून भाजपात प्रवेश केला, अशी माहिती लंका दिनकर यांनी दिली. तिहेरी तलाक आणि कलम 370 च्या निर्णयानंतर भाजपची लोकप्रियता प्रचंड वाढली असून आणखी नेते भाजपात येण्यासाठी उत्सुक आहेत, असंही ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमिताभ बच्चन यांची पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत