शिमला. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे अति मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामध्ये एका आठ मजली इमारत एका क्षणात कोसळली आणि जवळच्या दोन बांधकामांचे नुकसान झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
काची व्हॅली परिसरात भूस्खलन होत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्या भूस्खलनामुळे 8 मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसत आहेत.
हिमाचल प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक सुदेश कुमार मोख्ताने दिलेल्या माहितीनुसार, शिमल्यातील हाली पॅलेसजवळील घोडा चौकी येथील 8 मजली इमारत गुरुवारी दुपारी अलिकडच्या पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे क्षणात कोसळली.
ते म्हणाले की 8 मजली इमारतीचे काही भाग इतर 2 मजली इमारतींवर पडले, ज्यामुळे त्यांचेही नुकसान झाले. हॉटेलसह जवळपासच्या दोन इमारती अजूनही धोक्यात आहेत.
जिल्हा प्रशासनाने इमारतीतील रहिवाशांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 10 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.