मुलींच्या उच्च शिक्षणाच्यादृष्टीने राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
पैशाच्या अभावी शिक्षण अर्धवट राहत अशा मुलींसाठी राज्य सरकार ने मुलींसाठी एक घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलांनी मुलींच्या शिक्षणाबाबत लागणाऱ्या फी संबंधी मोठी घोषणा आज सोलापूर मध्ये केली.
1जून पासून राज्य सरकार राज्यातील ओबीसी आणि व्हीजेएनटी ,अल्प उत्पन्न घाटातील विद्यार्थिनीची 100 टक्के फी राज्य सरकार भरणार आहे.तसेच मुलींच्या फी साठी 1 हजार रुपयांची तरतूद केली जाईल. राज्य सरकारच्या उपसमितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बाबतचा जी आर अद्याप निघायचा आहे.
तसेच ज्या मुलींना राहण्यासाठी हॉस्टेल मिळाले नाही त्यांच्या निर्वाह भत्त्याची तरतूद करण्यात आली आहे.
तर मेट्रोसिटी मध्ये राहणाऱ्या विद्यार्थी -विद्यार्थींना दरमहा 6 हजार रुपये देण्यात येईल.तर छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रुपये 5300 तर तालुकास्तरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 3800 रुपये दरमहा निर्वाहभत्ता दिला जाणार आहे. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.