मुंबई : राज्यातील महत्वाचे गडकिल्ले व कातळशिल्पे जागतिक वारसा यादीत घेण्यासाठी युनेस्कोला सरकार विनंती करणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. गड किल्ले किंवा ग्रामीण भागातील दुर्मीळ होत जाणारी कातळ शिल्प जपून ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील 14 डोंगरी किल्ले, 8 सागरी किल्ले, 8 कातळशिल्पांचा यादीत समावेश आहेत. संबंधित किल्ले व कातळशिल्पे युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचे मुनगंटीवार म्हटले आहेत
गडकिल्ले आणि कातळशिल्पे संरक्षण आणि संवर्धनासाठी सरकारकडून हे मोठं पाऊल उचलण्यात आलं. राज्यात 14 डोंगरी किल्ले, 8 सागरी किल्ले आणि 9 कातळशिल्पांचा या यादीमध्ये समावेश आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं ही कातळशिल्प फार महत्त्वाची आहेत.
संबंधित किल्ले आणि कातळशिल्पे युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. दुर्लक्षित गडकिल्ले आणि कातळशिल्पांना यामुळे जीवदान मिळेल. शिवाय पर्यटकही मोठ्या प्रमाणात इथे येतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात कोकण भागात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर तसेच देवगड आणि सिंधुदुर्ग तालुक्यातील 50 गावांमध्ये छोटी मोठी कातळ शिल्पं आहेत. बारसूला ज्या भागात रत्नागिरीला होणार होता तिथेही कातळशिल्प आहेत असा दावा केला जात आहे. कातळशिल्प नष्ट झाली तर पर्यटनाला त्याचा मोठा फटका बसेल असं स्थानिकांचं म्हणणं आहे.