Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाडक्या बहिणींना झटका, या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाही

Ladki Bahin Yojana
, मंगळवार, 6 मे 2025 (10:52 IST)
लाडकी बहीण योजने बाबत मोठी बातमी येत आहे. राज्य सरकारने या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजने अंतर्गत सरकार आता लाडक्या बहिणींचे आर्थिक उत्पन्न तपासणार असून ज्या बहिणींचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे त्यांना योजनेची रक्कम 1500 रुपये मिळणार नाही. त्यांचे लाभ बंद केले जाणार आहे. 
राज्य सरकारच्या या निर्णयाने लाडक्या बहिणींना मोठा धक्का मिळणार आहे. सरकार आता लाडक्या बहिणींचे आर्थिक उत्पन्न तपासणार आहे. अडीच लाख रुपये हुन जास्त उत्पन्न असणाऱ्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांना या पुढे या योजनेचा हफ्ता मिळणार नाही.
 ALSO READ: मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्र्यांवर अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करा, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी
तसेच ज्या बहिणी दोन योजनांचा लाभ घेत आहे त्यांना या योजनेतून मिळणारा हफ्ता बंद केला जाणार आहे. या नंतर लाभार्थी महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न तपासले जाणार आहे. ज्यांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न अडीच लाख रुपयांहून अधिक आहे त्या लाभार्थी महिलांची नावे या योजनेतून वगळली जाणार आहे. सरकारने पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने लाडक्या बहिणींना धक्का बसणार आहे. 
सध्या या योजनेत एकूण 2.53 लाखांहून अधिक बहिणी लाभ घेत आहे. या लाभार्थी महिलांना एकूण 37,950 कोटी रुपये लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. तर या योजनेसाठी 34000 कोटी रुपयांचे बजेट काढले आहे.  
Edited By - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लाडक्या बहिणींना' मोठा धक्का, योजनेतून 2100 रुपये मिळणार नाहीत!