Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नितेश राणेंवर भडकाऊ भाषण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

nitesh rane
, सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (15:22 IST)
भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर भडकाऊ भाषण देत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर मध्येरामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ  हिंदू समाजातर्फे मोर्चा काढला. याला नितेश राणे यांचा पाठिंबा होता. एका कार्यक्रमाला संबोधित करताना नितेश राणे यांनी भडकाऊ भाषण दिले. या भाषणात त्यांनी मुस्लिमांना उघड धमकी दिली. मशिदीत प्रवेश करून आम्ही मुस्लिमांना निवडून मारू

या प्रकरणी नितेश राणेंवर चिथावणीखोर वक्तव्य आणि उघड धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर मध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यानंतर नितीश राणेंची सभा होती.त्यात त्यांनी मुस्लिमांना धमकावले.ते म्हणाले, आमच्या रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणीही काहीही बोलले तर आम्ही मशिदीत जाऊन निवडक मारू. रामगिरी महाराजांनी प्रेषितांवर भाष्य केल्यामुळे मुस्लिम समुदायाकडून त्यांच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले. 
श्रीरामपूर मध्ये आणि तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नितेश राणेंवर भडकाऊ भाषणे करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.तोफखाना पोलिस नितीश राणे यांना आज म्हणजेच सोमवारी नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावणार आहेत. नितीश राणे यांनी एका कार्यक्रमात मुस्लिमांना खुलेआम धमकावत ते मशिदीत येऊन त्यांना निवडक मारणार असल्याचे वक्तव्य दिले.भाजपला निवडणुकीपूर्वी जातीय हिंसाचार घडवायचा आहे, असा आरोप AIMIM नेते वारीश पठाण यांनी केला.  
Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रायव्हेट पार्टला विंचू चावला, हॉटेलवर गुन्हा दाखल, शारीरिक संबंध ठेवण्यात अडचण !