suvichar

हळद शिजवताना कुकरचा स्फोट होऊन नांदेडमध्ये एकाचा जागीच मृत्यू , तिघे जखमी

Webdunia
शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (11:59 IST)
कुकर मध्ये कच्ची हळद शिजवताना कुकरचा स्फोट होऊन एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाल्याची घटना नांदेडच्या मुखेड तालुक्यात दापका गुंडोपंत येथे काल घडली. सुनील मारवाड असे या मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 
 
वृत्तानुसार, हळद शिजवताना कुकर मधून पाणी गळती झाल्याने हा अपघात घडल्याचे वृत्त आहे. कच्ची हळद कुकरमध्ये शिजवताना कुकर मधून पाणी गळती का होत आहे हे बघण्यासाठी सुनील कुकर जवळ गेला  असता कुकरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयंकर होता की कुकरचे अक्षरश तुकडे होऊन दूरवर जाऊन पडले. या स्फोटात सुनील हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी मुलगा आणि एक अन्य मजूर हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर डोंगर कोसळले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

आधार कार्ड अपडेट करणे का आवश्यक आहे? हे अपडेट्स न केल्यास अनेक कामांमध्ये अडथळा येऊ शकतो

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये भव्य तिरंगा रॅली काढली, उद्धव ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणात नागपूर आणि संभाजीनगर येथे विशेष न्यायालये स्थापन होणार

पुढील लेख
Show comments