Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिंगोलीमध्ये दारूच्या नशेत वडिलांनी केला स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Hingoli News
, गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (11:28 IST)
महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडिलांनीच स्वतःच्या मुलीवर तीन वेळेस लैंगिक अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. 
 
पीडितेने पोलिसांनी सांगितले की, तिच्या जन्मदात्या वडिलांनीच तिच्यासोबत दुष्कृत्य केले. तसेच कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. पण पीडितेने धैर्य दाखवत गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी या वडील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करीत पीडितेच्या वडिलांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी सांगितले की आरोपीला कडक शिक्षा होईल असे प्रयत्न करण्यात येतील.  

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महायुती अडचणीत? 'Vote Jihad' या शब्दाची होणार चौकशी, निवडणूक आयोगाचा इशारा