Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आईने आपल्या 2 वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकले, मूल रडत राहिलं आणि आई मरणाची वाट पाहत राहिली

Webdunia
मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (14:52 IST)
महाराष्ट्रातील लातूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे सोमवारी एका महिलेने आपल्या 2 वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकून दिले. मुलाला बुडताना वेदना होत होत्या आणि आई त्याला बुडताना पाहत उभी होती. मूल मेल्याची खात्री झाल्यावर ती तिथून निघून गेली.
 
पोलीसांनी सांगितले की, माया पांचाल (२५) हिचा पती व्यंकट पांचाळ याने मुलगा संपतची हत्या केल्याचा आरोप केला आहे. मायाला अटक करण्यात आली असून तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
 
मानसिक आजारी असल्याचा संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकट एका खासगी कंपनीत कामाला असून सोमवारी ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते. परत येताना त्याने पत्नीला मुलाबद्दल विचारले. यावर महिलेने मुलाला विहिरीत टाकल्याचे सांगितले. महिलेचे असे उत्तर ऐकून व्यंकटच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. महिलेची प्रकृती पाहता तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलाला मारल्यानंतर ती बराच वेळ विहिरीजवळ बसून राहिली.
 
पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत होती
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, व्यंकट आणि माया पांचाल यांच्यात सतत भांडणे होत असत. या हत्येमागे दोघांमधील भांडणही कारणीभूत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेच्या 8 दिवसांपूर्वी दोघांमध्ये मारामारीही झाली होती. दोघांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना एकच अपत्य आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

पुढील लेख
Show comments