Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एक वर्षीय मुलीचा सोमवारी गोवरमुळे दुर्दैवी मृत्यू, मुंबईत गोवरबाधित रुग्णांची संख्या ३०३ वर पोहोचली

Webdunia
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (08:40 IST)
अंधेरी येथे राहणाऱ्या एक वर्षीय मुलीचा गोवरमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. तिचे लसीकरण झाले नव्हते. मुंबईत गेल्या अडीच महिन्यात गोवरमुळे 14 वा बळी गेला आहे. त्यामुळे पालिका आरोग्य यंत्रणेला गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणखीन कडक उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
 
अंधेरी येथील ज्या 7 वर्षीय मुलीचा गोवरमुळे मृत्यू झाला, तिचे लसीकरण झालेले नसल्याचे समोर आले आहे. तिला जन्मजात हृदयविकार होता. तिला उपचारासाठी महिनाभर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला 26 नोव्हेंबर रोजी ताप आणि पुरळ येऊन श्वसनास त्रास झाला होता. त्यामुळे तिला तातडीने उपचार करण्यासाठी पालिका रुग्णालयात दाखल करण्यात होते. मात्र उपचार सुरू असताना तिची प्रकृती गंभीर झाली आणि 28 नोव्हेंबर रोजी तिचा दुपारी 1.30 मिनिटांनी मृत्यू झाला. कालपर्यंत गोवरमुळे 13 रुग्णांचा बळी गेला होता. आता या मुलीच्या मृत्यूमुळे गोवरने 14 वा बळी घेतला आहे.
 
मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव झपाट्याने प्रसार होत असून, शहरात भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, तर पश्चिम उपनगरात वांद्रे पूर्व, अंधेरी पूर्व, मालाड उत्तर, पूर्व उपनगरातील गोवंडी, चेंबूर, कुर्ला, भांडुप या भागात गोवरचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे या विभागातून गोवरचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. गोवरच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत 14 रुग्णांचा बळी गेला असून, त्यापैकी 11 रुग्ण हे मुंबईतील तर 3 रुग्ण हे मुंबईबाहेरील होते. मुंबईत गोवरबाधित रुग्णांची संख्या 303 वर पोहोचली असून, संशयित रुग्णांची संख्या 4,062 वर पोहोचली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: वनजमीन वाटप प्रकरणी नारायण राणेंना सीजेआई भूषण गवईचा मोठा धक्का

वनजमीन वाटप प्रकरणी नारायण राणेंना सीजेआई भूषण गवईचा मोठा धक्का, दिले हे आदेश

मराठा आरक्षणाविरुद्धच्या याचिकांवर सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन, मुंबई उच्च न्यायालयाने तीन न्यायाधीशांची नियुक्ती केली

नीरज आज दोहा डायमंड लीगमध्ये दाखवणार आपले कौशल्य,भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक जाणून घ्या

तुळजापूर मंदिर ट्रस्टने 12 पुजाऱ्यांवर कारवाई केली

पुढील लेख
Show comments