Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जम्मू मध्ये हिमस्खलनात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

Three jawans died in the avalanche  son of Maharashtra died  Manoj gaikwad
, रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (15:52 IST)
जम्मू-काश्मीर मध्ये कुपवाडा जिल्ह्यात मच्छल सेक्टर मध्ये शुक्रवारी हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यू झाला. हे तिन्ही जवान नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालण्याचे कर्तव्य बजावत असताना ही घटना घडली. अचानक यावेळी हिमस्खनल झाला आणि लष्कराचे हे तिन्ही जवान मरण पावले. लान्सनाईक मनोज लक्ष्मण राव गायकवाड, लान्सनायक मुकेश कुमार आणि गनरसौविक हजरा अशी हिम्सखनलात मुर्त्युमुखी झालेल्या जवानांची नावे आहेत.

माच्छिल सेक्टरच्या अलमोरा पोस्टजवळ शुक्रवारी गस्तीवर असताना अचानक जवानांच्या अंगावर बर्फाचा थर कोसळला. यात दुर्दैवी घटनेत तीन जवानांना प्राण गमवावे लागले. घटनेनंतर सुरक्षा दलाच्या पथकाने बचाव कार्य सुरू केले. त्यांनी तिन्ही जवानांना बर्फातून बाहेर काढले, त्याआधीच तिन्ही जवानांचा मृत्यू झाला. 

हिम्सखनलात शहीद झालेले लान्स नायक मनोज लक्ष्मणराव गायकवाड(41) हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील चिंचखेडे येथील असून ते 2002 मध्ये लष्करामध्ये भरती झाले होते. लायन्स नायक मुकेश कुमार(22) हे राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील लाडनून तालुक्यात सजवंतगड येथील असून 2018 मध्ये लष्करात दाखल झाले होते. तर गनर सौविक हजरा(22) हे पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यातील खमरबेरिया येथील रहिवासी असून 2019 मध्ये लष्करात दाखल झाले होते. 

Edited By- Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॉट्सअॅपचे डिलीट केलेले मेसेज परत मिळवायचे आहे या टिप्स अवलंबवा