Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

१५ दिवसांच्या कालावधी साईच्या झोळीत चक्क १८ कोटींचे दान

A total of 18 crores
, गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (21:44 IST)
२० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात साई भक्तांनी शिर्डी मध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली या काळात साईच्या झोळीत चक्क १८ कोटींचे दान मिळाले आहे.शिर्डी मध्ये साईंच्या चरणाशी लीन होत लाखो भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान केले आहे. भारता बरोबरच ईतर देशांतून देखील मोठ्या प्रमाणावर दान करण्यात आलेल आहे.विशेष म्हणजे अगदी कमी वेळेत म्हणजेच १५ दिवसांच्या कालावधी मध्ये १८ कोटी रुपयांचे दान साई दरबारात झाले आहे.
 
शिर्डी मधील दानपेटीत २९ देशातील २४ लाख ८० हजार रुपये किमतीच्या परकीय चालना सह ३९ लाख ५३ हजार रुपयांची सुमारे ८६०.४५० ग्रॅम सोने आणि ५ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या १३३४५ ग्रॅम चांदी इतक दान मिळालाय . साई दर्शन साठी आलेल्या भाविकांना साई संस्थान प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर सेवा उपलब्ध करून दिल्या.
 
 
शिर्डी मध्ये मिळालेल्या दानाचा तपशील पुढील प्रकारे
 
*दक्षिणा पेटी -३ कोटी ११ लाख ७९ हजार १८४ रुपये
 
*देणगी काउंटर-७ कोटी ५४ लाख ४५ हजार ४०८ रुपये
 
*ऑनलाईन देणगी -१ कोटी ४५ लाख ४२ हजार ८०८ रुपये
 
*चेक -३ कोटी ३ लाख ५५ हजार ९४६ रुपये
 
*मनीऑर्डेर-७लाख २८ हजार ८३३ रुपये
 
*डेबिट /क्रेडीट कार्ड -१ कोटी ८४ लाख २२ हजार ४२६ रुपये
 
*सोने -८६०.४५० ग्रॅम
 
*चांदी -१३३४५.९७० ग्रॅम
 
*परकीय चलन-२४.८० लाख (२९ देशांचे )
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, अलर्ट जारी