Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सिडकोच्या एकूण 6,508 सदनिका विक्रीकरिता उपलब्ध होणार

सिडकोच्या एकूण 6,508 सदनिका विक्रीकरिता उपलब्ध होणार
, बुधवार, 16 मार्च 2022 (08:39 IST)
सिडकोतर्फ 5730 सदनिकांच्या महागृहनिर्माण योजना 2022 अंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडमधील अतिरिक्त सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एकूण 6,508 सदनिका विक्रीकरिता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबईमध्ये आपले हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे.
 
योजनेतील अर्ज नोंदणी ते सोडत या दरम्यानच्या सर्व प्रक्रिया या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. या करिता www.lottery.cidcoindia.com या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. अर्जदारांना अर्ज नोंदणी, कागदपत्रे सादर करणे आणि अनामत रकमेचा भरणा करायचा आहे. पण अर्जदारांना ठिकाण (नोड) निवडण्याचा पर्याय उपलब्ध असणार नाही. संगणकीय सोडत काढून वरीलपैकी कोणत्याही ठिकाणची सदनिका अर्जदारांना सिडकोकडून वाटपित करण्यात येईल.
 
सिडको महामंडळातर्फे 26 जानेवारी 2022 रोजी 5,730 घरांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील वेगाने विकसित होणाऱ्या तळोजा नोडमध्ये 5,730 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या सदनिकांव्यतिरिक्त नवी मुंबईच्या द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा नोडमधील काही अतिरिक्त सदनिका सदर योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. 
 
यामुळे सदर योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता द्रोणागिरी येथे 181, घणसोली येथे 12, कळंबोली येथे 48, खारघर येथे 129 आणि तळोजा येथे 1535, अशा एकूण 1905 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता द्रोणागिरी येथील 241, कळंबोली येथील 22, खारघर येथील 88 आणि तळोजा येथील 4252, अशा एकूण 4,603 सदनिका उपलब्ध आहेत. याप्रमाणे, एकूण 6,508 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
 
पहिली सोडत पार पडल्यानंतर अ.जा./अ.ज./भ.ज./वि.ज. या वैधानिक आरक्षित प्रवर्गातील सदनिका शिल्लक राहिल्यास त्वरित दुसरी सोडत काढण्यात येऊन या सदनिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भरधाव वेगाने कार बाजूने घेऊन गेल्याचा राग; गावगुंडांचा तरूणावर तलवारीने जीवघेणा हल्ला